‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात योग प्रशिक्षण व व्याख्यान शिबिरे

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा आयुष कक्ष, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने योग प्रशिक्षण व व्याख्यान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय आयुष विभाग, महिला व बाल रुग्णालय कुडाळ, ग्रामीण रुग्णालय वैभववाडी, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, ग्रामीण रुग्णालय मालवण, उपजिल्हा रुग्णालय कणकवली, ग्रामीण रुग्णालय पेंडूरकट्टा, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, ग्रामीण रुग्णालय देवगड, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग आणि ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे योग प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. शिबिरांचे नियोजित वेळापत्रक दि. १७ सप्टेंबर – जिल्हा रुग्णालय, आयुष विभाग, सिंधुदुर्ग दि. १९ सप्टेंबर – महिला व बाल रुग्णालय, कुडाळ दि. २१ सप्टेंबर – ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी दि. २२ सप्टेंबर – उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी दि. २३ सप्टेंबर – ग्रामीण रुग्णालय, मालवण दि. २६ सप्टेंबर – उपजिल्हा रुग्णालय, कणकवली दि. २९ सप्टेंबर – ग्रामीण रुग्णालय, पेंडूरकट्टा दि. ३० सप्टेंबर – उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा दि. १२ ऑक्टोबर – उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला दि. १३ ऑक्टोबर – ग्रामीण रुग्णालय, देवगड दि. १४ ऑक्टोबर – ग्रामीण रुग्णालय, दोडामार्ग दि. १७ ऑक्टोबर – ग्रामीण रुग्णालय, कुडाळ. ‘सेवा संकल्प अभियान’ कालावधीत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये व इतर संस्थांमध्येही योग प्रशिक्षण व व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या योग प्रशिक्षण व व्याख्यान शिबिरांमध्ये सहभागी होऊन उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'