पणजी येथे 16 सप्टेंबर रोजी डाक अदालत, 11 सप्टेंबर पर्यंत मुदत

सिंधुदुर्ग, दि. 10 (जिमाका) : टपाल सेवा देशाच्या सामाजिक व आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग असून, त्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने वेळोवेळी ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात येते. या माध्यमातून तक्रारदार ग्राहकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे तातडीने निवारण करण्यात येते. पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी यांच्या कार्यालयात दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रादेशिक स्तरीय डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा विभागाशी संबंधित टपाल सेवांबाबतच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही, अशा तक्रारींची दखल या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे. यामध्ये टपाल (Mails), स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक तसेच मनीऑर्डरची रक्कम न मिळणे यांसारख्या तक्रारींचा विचार करण्यात येणार आहे. इच्छुक ग्राहकांनी तक्रार सादर करताना तक्रारीशी संबंधित तारखेपूर्वी मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली त्या अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम तसेच तक्रारीशी संबंधित आवश्यक तपशील नमूद करणे आवश्यक आहे. टपाल सेवांबाबतच्या तक्रारींच्या दोन प्रती सहाय्यक संचालक (टपाल सेवा-१) पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी - 403001 यांच्याकडे पाठवाव्यात. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. 11 सप्टेंबर 2026 असून, संबंधित ग्राहकांनी विहित मुदतीत आपल्या तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन टपाल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'