पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

सिंधुदुर्ग, दि. २२ (जिमाका) : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्गातील भटक्या जमाती-क (NT-C) प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत १२ वी नंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची एक प्रत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे जमा करावी. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा’ लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'