रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत सिंधुदुर्गात ११ ठिकाणी रोजगार मेळावे जिल्ह्यातील सर्व नियोक्ते, उद्योग, कंपन्या व आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

सिंधुदुर्ग, दि. १६ (जिमाका) : राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर ५०० हून अधिक ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रोजगार मेळावे सावंतवाडी- टोपीवाला स्मारक तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी, कुडाळ- संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, दोडामार्ग- दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग, वैभववाडी- अनगरसिद्ध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगुळवाडी, ता. वैभववाडी, सावंतवाडी- यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी, कणकवली- आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, फोंडाघाट, कणकवली- एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली, कुडाळ- श्री. पुष्पसेन सावंत कृषी/फार्मसी/नर्सिंग महाविद्यालय, वाडी हुमरमळा (डिगस), मालवण- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण, देवगड- श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड, वेंगुर्ला- प्रादेशिक फळ प्रक्रिया संशोधन केंद्र, वेंगुर्ला या ठिकाणी होणार आहेत. या रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योग, कंपन्या, दुकाने व विविध आस्थापनांना त्यांच्या गरजेनुसार पात्र व कुशल मनुष्यबळ थेट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नियोक्ते, उद्योग, कंपन्या व आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्याकडील रिक्त पदांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त अमिन तडवी यांनी केले आहे. नियोक्त्यांनी रिक्त पदांची नोंदणी https://forms.gle/MrzcGc3ofqq३७wwr६ या लिंकवर किंवा उपलब्ध QR कोडच्या माध्यमातून करावी. यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक स्थानिक युवक-युवतींना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाइन नोंदणी करताना काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या ०२३६२-२२८८३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाचे फेसबुक व इंस्टाग्राम पेज ‘sindhudurg_rojgar’ तसेच कार्यालयाच्या व्हॉटसअप चॅनेलला भेट द्यावी. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'