विशेष रांगोळीतून ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ

सिंधुदुर्ग, दि. २२ (जिमाका) : समाज कल्याण विभागामार्फत दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ दि. १७ सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आला. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारी विशेष रांगोळी काढण्यात आली. तसेच ‘गटई स्टॉल’ योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन ‘संकल्पाचा दिवा’ प्रज्वलित करून अभियानाचा संदेश देण्यात आला. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'