‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत समाज कल्याण विभागातर्फे वृक्षारोपण

सिंधुदुर्ग, दि. २२ (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच विविध लोककल्याणकारी उपक्रमांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘सेवा माझे योगदान’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय तसेच अधिनस्त आठ शासकीय वसतिगृहांमध्ये दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विशेष अधिकारी तुषार गवळी, सहायक लेखाधिकारी उदय यादव यांच्यासह समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि शासकीय वसतिगृहांतील कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. oooooooo

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'