सेवा संकल्प अभियानात कणकवलीत नागरिकांना महसूल सेवा

सिंधुदुर्ग, दि. २१ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत तहसील कार्यालय, कणकवली येथे दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उपस्थित नागरिकांना महसूल विभागामार्फत विविध दाखले व सेवांचा लाभ देण्यात आला. शिबिरामध्ये नागरिकांना शिधापत्रिका, ७/१२ उतारे, उत्पन्न दाखले, वय व अधिवास दाखले, नॉन क्रिमीलेयर दाखले आणि जात दाखले आदी सेवांचा लाभ देण्यात आला. तसेच नवीन नाव नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या अर्जांचे वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये शिधापत्रिकेसाठी ५, ७/१२ उताऱ्यांसाठी ५, उत्पन्न दाखल्यासाठी ५, वय व अधिवास दाखल्यासाठी ४, नॉन क्रिमीलेयर दाखल्यासाठी ३ आणि जात दाखल्यासाठी ५ नागरिकांना सेवा देण्यात आली. याशिवाय नागरिकांना ५ नवीन नाव नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'