पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा OBC, VJNT, SBC व NT-C प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), विशेष मागास प्रवर्ग (SBC) तसेच भटक्या जमाती-क (NT-C) प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील बारावी नंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून अर्ज करण्यास दि. 1 सप्टेंबर 2026 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे.पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज भरावा. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या कार्यालयात जमा करावी. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांनी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा’ लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. 0000000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'