आंबा काजू नुसकान भरपाई मिळणेसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. ११ (जिमाका) :जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुषंगाने नुकसान भरपाई मिळणेकारिता शासनामार्फत आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे पंचनामे पूर्ण करून शासनास नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आलेला होता, त्यानुसार शासनाने आंबा व काजू पिकासाठी नुकसान भरपाई शासन निर्णयाद्वारे मंजूर केली आहे. तसेच सदर पंचनामे पोर्टल ला अपलोड करण्यात आले आहेत. परंतु अपलोड केलेल्या २४५० शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नसल्याने त्यांना नुकसान भरपाई ची रक्कम प्राप्त झालेली नाही. तरी याद्वारे आवाहन करण्यात येते कि, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी आपली ई-केवायसी तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून आंबा व काजू नुकसान आंबा व काजू भरपाई ची रक्कम आपले बँक खात्यावर जमा होईल. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'