विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांची पावशी (ढवनवाडी) ता. कुडाळ येथील मतदान केंद्रास भेट

सिंधुदुर्ग, दि. 3 (जिमाका) : कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी आज दुपारी पावशी (ढवनवाडी) ता. कुडाळ येथील मतदान केंद्राला भेट देऊन विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची क्षेत्रीय पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील मतदार यादी, उपलब्ध सुविधा तसेच विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या विविध कार्यवाहीची माहिती घेतली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदार यादी अधिक अचूक व निर्दोष करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, कुडाळ उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूसे, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील तसेच सरपंच वैशाली पावसकर, ग्रामपंचायत सदस्य वृणाल कुंभार, नयना तवटे, ग्रामपंचायत अधिकारी डी.एस. चव्हाण, बीएलओ गंगाराम पारकर, पोलिस पाटील शेखर शेलटे, तलाठी लता पाटील उपस्थित होते. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'