सशस्त्र दलातील अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. 3 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी शासनाच्या वतीने छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे SSB कोर्स क्र. 66 आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण दि. 21 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणार असून, जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी भारतीय सशस्त्र दलामध्ये अधिकारी पदावर सेवा करण्याची ही सुवर्णसंधी घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी प्राप्त करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध DSW Portal मधील Resources – PCTC Nashik SSB 66 येथून प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढावी. प्रवेशपत्र व परिशिष्टे पूर्ण भरून सोबत आणावीत. या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळण्यासाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे : • कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) किंवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असावे. • एनसीसी स्पेशल एन्ट्री साठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. • टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. • विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे. प्रशिक्षणासाठी येताना संबंधित पात्रता प्रमाणपत्र अथवा SSB कॉल लेटर सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी कार्यालयीन वेळेत training.petenashik@gmail.com, दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्सॲप क्र. 9156073306 वर संपर्क साधावा. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'