१७४३ आंबा-काजू बागायतदारांच्या खात्यावर ३ कोटी ९४ लाखांची नुकसान भरपाई जमा

सिंधुदुर्ग, दि. २९ (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, दि. २८ सप्टेंबर २०२६ अखेर आणखी १ हजार ७४३ आंबा-काजू बागायतदारांच्या बँक खात्यावर ३ कोटी ९४ लाख ८ हजार २५१ रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत नुकसान भरपाई मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ३५५ झाली आहे. जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी एकूण ३४ हजार ९१२ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ७६ कोटी ३८ हजार ७८० रुपये निधीला पोर्टलद्वारे मान्यता दिली आहे. यापैकी यापूर्वी २६ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५९ कोटी २३ लाख ४५ हजार ९४५ रुपये नुकसान भरपाई जमा झाली होती. त्यानंतर आता १ हजार ७४३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ कोटी ९४ लाख ८ हजार २५१ रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण २८ हजार ३५५ शेतकऱ्यांना ६३ कोटी १७ लाख ५४ हजार १९६ रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रियाही सुरू आहे. अद्ययावत आकडेवारीनुसार २ हजार ४१७ लाभार्थी शेतकऱ्यांची ३ कोटी ८६ लाख रुपये रक्कम पेमेंटसाठी प्रलंबित आहे. तसेच १ हजार ५६२ लाभार्थी शेतकऱ्यांचे ३ कोटी ७६ लाख रुपये पेमेंट रिजेक्ट झाले असून, संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. तर २ हजार ५७८ लाभार्थी शेतकऱ्यांची ५ कोटी १९ रुपये रक्कम ई-केवायसी प्रलंबित असल्याने वितरित झालेली नाही. नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होण्यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे तसेच बँक खाते व आधार संलग्नतेबाबत आवश्यक पूर्तता करणे गरजेचे आहे. प्रलंबित लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय अथवा नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रामार्फत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'