सावंतवाडी येथे POCSO कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक १३ (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गच्या वतीने लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO Act) या विषयावर जनजागृती कार्यक्रम दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी यशवंत भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे संपन्न झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली. या कार्यक्रमाला सहाय्यक लोक अभिरक्षक ॲङ ऋचा लोखंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमन बने, उपप्राचार्य गजानन भोसले, श्री. पाटील, श्रीम.प्राजक्ता राणे उपस्थित होते. सध्याच्या काळात अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या (Pocso) प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरुकता निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. मुलामुलींमध्ये आकर्षण व प्रेमसंबंध निर्माण होणे स्वाभाविक असले तरी त्यामागील कायदेशीर परिणामांची जाणीव नसल्यामुळे त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. या पर्श्वभूमीवर (Pocso) कायद्याची मूलभूत माहिती, संमतीचे वय, कायद्यातील गुन्ह्यांचे प्रकार, तसेच उल्लंघन झाल्यास होणारे दंडात्मक परिणाम यायबाबत ॲङ ऋचा लोखंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भोसले पॉलिेक्निक महाविद्यालयातील सुमारे ६०० विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये डिप्लोमा, सिव्हिल, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले आणि कायद्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता दर्शविली. कार्यक्रमादरम्यान योग्य व अयोग्य स्पर्श, सोशल मीडियावरील जबाबदारी, तसेच अल्पवयीन मुलांशी संबंधित कायदेशीर बाबी याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘अज्ञानामुळे चूक होऊ नये’ या उद्देशाने कायद्याची माहिती सोप्या व समजण्यासारख्या भाषेत स्पष्ट करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालन प्रो. श्रीम. प्राजक्ता राणे यांनी केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'