सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हिंद-दी-चादर’चा जागर; विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आरोग्य शिबिरे, चित्रकला स्पर्धा व समूह गीतातून गुरु तेग बहादूर साहिबजींच्या त्यागाचा संदेश
सिंधुदुर्गनगरी दि. १४ (जिमाका):- ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या त्याग, बलिदान आणि धर्मनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांसह शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये चित्रकला, गीत गायन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. गुरु तेग बहादुर सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रफित देखील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. तसेच विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली आणि रा. कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्ला येथे
येथे गुरु तेग बहादूर साहबजी यांच्या जीवनाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित असलेले जीवनपट व्हिडिओच्या आधारे दाखवण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आरोग्य शिबिरे, प्रभात फेर्या, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देण्यात येत आहे.
हिंद-दी-चादर’ या विशेष उपक्रमांतर्गत आरोग्य मंदिर ओसरगाव, कळसुली येथे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र,नांदगाव येथे विशेष सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित नागरिकांना निःशुल्क वैद्यकीय सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुंच्या त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशाला कृतीतून अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
या उपक्रमांचा मुख्य उद्देश तरुण पिढीने गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा त्याग, बलिदान आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले योगदान स्मरणात ठेवावे, तसेच राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक मूल्यांची जपणूक करावी, हा आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘हिंद-दी-चादर’चा जागर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावीपणे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
००००००
Comments
Post a Comment