थकबाकीदारांना व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत

सिंधुदुर्गनगरी,:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ (ओबीसी महामंडळाच्या) संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेच्या 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा ( OTS) योजना 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या सर्व थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रीती आर पटेल यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग (ओबीसी महामंडळ) यांच्यामार्फत व्यवसायाकरिता पात्र लाभार्थींना मुदती कर्ज, बीज भांडवली कर्ज, स्वर्णिमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना,इ.योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील कर्जवाटप करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्ग तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग किंवा दूरध्वनी क्रमांक 02362 228119 या क्रमांकावर संपर्क साधावा. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'