आयएमसी ऑफ आयटीआय वेंगुर्ला येथे लिपिक पदासाठी भरती
सिंधुदुर्गनगरी दिनांक १६ (जिमाका) :- आयएमसी ऑफ आयटीआय वेंगुर्ला या नोंदणीकृत संस्थेच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजासाठी लिपिक वर्गीय एक पद तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्जासह सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे व अनुभव प्रमाणपत्रे घेऊन दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयएमसी ऑफ आयटीआय वेंगुर्ला, म्हाडा कॉलनी समोर, महिला काथ्या कारखाना नजीक, वेंगुर्ला येथे मुलाखतीसाठी स्वतः उपस्थित राहण्याचे आवाहन वेंगुर्ला आयएमसी ऑफ आयटीआयचे सचिव जे.एल. गवस यांनी केले आहे.
या पदासाठी शैक्षणिक अर्हता पदवीधर (वाणीज्य) असून उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील आयत्या वेळच्या विषय क्र. ३ च्या ठरावानुसार ही भरती ठोक मानधनावर ११ महिन्यांच्या कालावधीकरिता करण्यात येणार असल्याची माहिती वेंगुर्ला आयएमसी ऑफ आयटीआयचे सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
०००००००
Comments
Post a Comment