श्री गुरु तेग बहादूर साहिब जी शहीदी 350 वा शहीदी समागम निमित्त "हिंद-दी-चादर" आरोग्य शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि. १८ (जिमाका):- दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गुरु तेग बहादूर साहिब जी शहीदी ३५० वा शहीदी समागम निमित्त "हिंद-दी-चादर" आरोग्य शिबिर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे संपन्न झाले. उपरोक्त जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग मार्फत ३५० लाभार्थी व ग्रामीण रुग्णालय कुडाळ मार्फत १४० लाभार्थ्यांना विशेष सेवा देण्यात आल्या. यामध्ये डायबिटीस, उच्च रक्तदाब, कॅन्सर निदान व उपचार, गरोदर माता तपासणी, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात सेवा, लसीकरण, सिटी स्कॅन,फिजिओथेरपी, पॅलिएटिव्ह केअर, सोनोग्राफी, अपंग प्रमाणपत्र, क्ष किरण तपासणी, सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, ईसीजी, आहार व पोषण समुपदेशन इत्यादींचा समावेश होता. या 'आरोग्य शिबिरा' करिता ग्रामीण रुग्णालय कुडाळ मार्फत डॉ.संजय वाळके (वैद्यकीय अधिक्षक), डॉ.करंबळेकर (वैद्यकीय अधिकारी), डॉ.बोरवडे (वैद्यकीय अधिकारी) डॉ. दुधगावकर (आरबीएसके वैद्यकीय अधिकारी) डॉ. गंगावणे (आरबीएसके वैद्यकीय अधिकारी) यांनी सेवा दिली. जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैदयकिय अधिकारी, वर्ग १ बाहयसंपर्क डॉ. सुबोध इंगळे, अतिरक्ति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्जुन नरोटे व वैदयकिय अधिकारी डॉ. तुषार चिपळुणकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'