निवृत्तीवेतनधारकांसाठी सायबर सुरक्षेवर ऑनलाईन वेब सेमिनारचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक ११ (जिमाका) :- सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सायबर सुरक्षेवर आधारित ऑनलाईन वेब- सेमिनार जिल्हा कोषागार कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. लेखा व कोषागार संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई व C - DAC यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी केले आहे. आजच्या डिजिटल युगात होणारी सायबर फसवणूक टाळण्यासाठी आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यासाठी हा उपक्रम राविला जात आहे. या सेमिनारमध्ये इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदार वापर, ऑनलाईन बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांची सुरक्षितता, सायबर फसवणूक, अर्थिक घोटाळ्यांचे प्रकार, फसवणूक ओळखण्याचे, टाळण्याचे व तक्रार नोंदविण्याचे मार्ग, जेष्ठ नागरिकांसाठी सायबर स्वच्छता (Cyber Hygiene) विषयक महत्वाच्या सूचना, वास्तविक फसवणुकीची प्रकरणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'