सिंधुदुर्गनगरी येथे डाक पेंशन अदालत

सिंधुदुर्गनगरी दिनांक १३ (जिमाका) :- टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारक व कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांसाठी डाक पेंशन अदालत ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर नंदकुमार कुरळपकर यांनी दिली आहे. निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबधित तक्रारी, टपाल विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना मृत्यु झालेला आहे. सिंधुदुर्गमधील निवृत्तिवेतनधारक ज्यांचे ३ महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यासंह प्रकरणे जसे की वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबीसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी.च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरण, नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकारी इत्यादी आणि निती प्रकररणांशी संबंधित तक्रारींचा विचार केला जाणार नाही. पेंशनधाकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या (एकत्रित स्वरुपात किंवा इतरांच्या वतीने नाही) संलग्र नमुन्यात ३ प्रतीमध्ये नंदकुमार कुरळपकर, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी ४१६८१२ या पत्यावर दिनांक ३ मार्च २०२६ रोजी किंवा त्यापुर्वी सादर करावी, त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'