आरवली टांक, वेंगूर्ला येथे रक्तदान शिबिर यशस्वी संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील रक्तकेंद्र आणि रक्तसंकलन विभागामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे सातत्याने आयोजित केली जातात . या उपक्रमाचा एक भाग म्हणुन, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी आरवली टांक ता. वेंगूर्ला येथे भव्य रक्तदान शिबीर यशस्वी पार पडले. या शिबीराला तेथील शिव प्रेमी मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच आरवली टांक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात शिव प्रेमी मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांनी स्व-इच्छेने रक्तदान केले. या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील अनुभवी टीम उपस्थित होती, त्यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले आणि रक्तदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत केली. या उपक्रमामध्ये सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या सर्व शिव प्रेमी मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच आरवली टांक या गावातील ग्रामस्थ यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले. ००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'