उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे २७ फेब्रुवारीला ‘विशेष मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्प’चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- जिल्ह्यातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दु.३ यावेळेत उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे 'विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प' चे आयोजित करण्यात आला आहे. या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.अनंत डवंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तपासले जाणारे आजार व लक्षणे: या मोहिमेअंतर्गत खालील आजारांच्या रुग्णांची तज्ज्ञांमार्फत तपासणी केली जाईल: हृदयरोग: छातीत दुखणे, धाप लागणे, घाम येणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित असणे कर्करोग (कॅन्सर): स्तनातील गाठ, तोंडात न भरणारी जखम किंवा गर्भाशय मुखाचे आजार स्त्री रोग: मासिक पाळीच्या समस्या, पांढरे पाणी जाणे किंवा वंध्यत्व। अस्थिरोग: हाडे, सांधे व मणक्याचे आजार किंवा जुनी दुखापत शल्यचिकित्सा/पोटाचे विकार: मूळव्याध, भगंदर, हर्निया किंवा अपेंडिक्स मूत्ररोग: किडनी स्टोन, लघवीला जळजळ होणे किंवा प्रोस्टेट समस्या ग्रंथीरोग: थायरॉईड, मधुमेह (शुगर) आणि हार्मोनल बदल. तरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.अनंत डवंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, यांनी जिल्ह्यातील सर्व वरील प्रमाणे व्याधीग्रस्त रुग्णांनी या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००००० --

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'