फोंड्यात अंतरराज्यीय रक्तदान शिबिर संपन्न
सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आणि सार्थक फाँडेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ८ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतरराज्य रक्तदान शिबिर गोवा राज्यातील फोंडा या ठिकाणी संपन्न झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अनंत डवंगे यांनी दिली.
या शिबीराला गोवा राज्यातील विविध सामाजिक संस्था, पदाधिकारी, स्थानिक नागरिक, पत्रकार तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबीरात अनेक नागरिकांनी स्व-इच्छेने रक्तदान केले. या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील अनुभवी टीम उपस्थित होती, त्यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले आणि रक्तदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत केली.
या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले.
००००००
Comments
Post a Comment