मालवण येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यावतीने भव्य कायदेविषयक सेवा शिबिराच्या निमित्ताने रा.ब.अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, ता.मालवण येथे १ मार्च २०२६ रोजी एकूण ४५ जागांकरिता प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली पदांसाठी आवश्यक पात्रता तपासून सहभाग नोंदवावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी यांनी केले आहे. उपलब्ध पदे व पात्रता पुढीलप्रमाणे :- कुडाळ येथील लक्ष्मी नारायण होंडा, येथे मेकेंनिक-आय.टीप.आय.मेकेंनिक/डिप्लोमा मेकेंनिक, सेल्स एक्झिक्युटिव्ह- १०वी/१२वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर, बॅक ऑफीस असिस्टंट- कोणत्याही शाखेतील पदवीधर व एमएससीआयटी प्रमाणपत्र. एकूण पदसंख्या-२५ कुडाळ येथील बजाज शोरुम कुडाळ:- बॅक ऑफीस असिस्टंट- कोणत्याही शाखेतील पदवीधर व एमएससीआयटी प्रमाणपत्र, सेल्स एक्झिक्युटिव्ह- १०वी/१२वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर, मेकॅनिक-आय.टीप.आय.मेकॅनिक/डिप्लोमा मेकॅनिकल, एकूण पदसंख्या-२० प्लेसमेंट ड्राईव्ह प्रत्यक्ष मुलाखतीने रा.ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, ता.मालवण, येथे आहे. सर्व ईच्छुक उमेदवारानी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे. ही एक उत्तम रोजगार संधी असून, स्थानिक युवक - युवतीनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ईमेल:sindhudurgrojgar@gmail.com, किंवा दूरध्वनी:०२३६२-२२८८३५ येथे संपर्क साधावा. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'