टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी १७ मार्च रोजी पेंशन अदालत

सिंधुदुर्गनगरी दिनांक ०४ (जिमाका) :- टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांसाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या वतीने ५८ वी पेंशन अदालत मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई–४०० ००१ येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुग विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे. निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत. ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांचे ३ महिन्याच्या आत पूर्तता झालेली नाही, अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल. पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मु‌द्द्‌यांसह प्रकरणे जसे की वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबीसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. पेन्शनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या (एकत्रित स्वरूपात किंवा इतरांच्या वतीने नाही) संलग्न नमुन्यात तीन प्रर्तीमध्ये वरिष्ठ लेखाधिकारी / सचिव, पेन्शन अदालल, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी.ओ. इमारत, १ ला मजल्ला, मुंबई- ४०० ००१ येथे पाठवावी किंवा ई-मेल‌द्वारे accts.mh@indiapost.gov.in या पत्त्यावर दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.असेही प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'