कॅन्सर जागरूकता अभियान कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न
सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी कॅन्सर जागरूकता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. अविनाश सावजी, संचालक, प्रयास संस्था, अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
प्रयास संस्था, अमरावती यांच्या माध्यमातून दि. ९ फेब्रुवारी ते दि. १४ फेब्रुवारी या कालावधीत कोकणातील सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, दापोली व माणगांव या ठिकाणी कॅन्सर प्रबोधन यात्रा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, कॅन्सर आजाराविषयी भीती व अज्ञानता दूर करण्यासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड यासारख्या इतर आजरांचा धोका कमी करण्यासाठी आपली जिवनशैली कशी असवी याबाबत डॉ. अविनाश सावजी यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या चमूतील कॅन्सरवर मात केलेल्या कॅन्सर योध्यांची ओळख उपस्थितांना करून दिली.
अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी कॅन्सर तसेच इतर गंभीर व क्रोनिक आजारांवर प्रतिबंधक उपाय म्हणून जीवनशैलीतील बदल, आहारातील बदल, नियमित व्यायाम, मानसिक व भावनिक संतुलन यासारख्या उपायांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, कार्यक्रमाची व्यापकता वाढविण्यासाठी व यामध्ये जिल्हा प्रशासनाचा सहभाग अंतर्भूत करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याशी चर्चा करण्याचे डॉ. डवंगे यांनी सांगितले.
००००००
Comments
Post a Comment