सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जिमाका):- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती जमाती, विमुक्त भटक्या जमाती मधिल सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्यंकरणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करावा. त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्ममश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले,आंबेडकर पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार उपरोक्त पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्था याना प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यामधील इच्छुक व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहित नमुन्यातील प्रस्ताव 15 मार्च 2026 पर्यंत 4 प्रतित सर्व कागदपत्रासह सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यानी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'