मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी दिनांक ०३ (जिमाका) :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्याच्या ठिकाणाच्या आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदानाच्या दिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याकरीता शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील खाली नमूद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. तसेच या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. मतदानाच्या दिवशी आवठवडा बाजार बंद करण्याचे गावांचे नाव पुढीलप्रमाणे :- देवगड तालुक्यातील मिठबांव, कणकवली तालुकयातील खारेपाटण, मालवण तालुक्यातील सुकळवाड, माळगांव, सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा, कलंबीस्त, दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील आवठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'