अनुदान योजनेसाठी २० फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी दिनांक १० (जिमाका) :- अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त, सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांनी पयाभूत सोयी- सुविधा पुरविण्यासाठी १० लाख पर्यंत अनुदान योजना सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात येत, असल्याची माहिती जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यशवंत बुधावले यांनी दिली आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतीक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन २०२५-२६ या वर्षाकरीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अल्पसंख्याक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि.२० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सादर करावेत. या प्रस्तावांमध्ये शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या एकूण १३ पायाभूत सोयी सुविधांपैकी आवश्यक सोई- सुविधांकरीता अनुदानाचे प्रस्ताव रु. १० लाखाच्या मर्यादेत सादर करावेत. विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक तपशील महाराष्ट्र शासन निर्णयमध्ये उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांची दखल घेण्यात येणार नाही. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'