सावंतवाडीत रोजगार मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक ११ (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, तसेच मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आयटीआय प्रशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथे अप्रेंटिसशिप रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये Sindhudurg Apprenticeship job Fair ४ मध्ये आपली अप्रेंटिसशिप ची रिक्तपदे अधिसूचित करावीत. तसेच नोकरी साधक (job Seeker) उमेवारांनी पोर्टलवर स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित अप्रेंटिसशिप पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे, तसेच दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथे हजर रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ०२३६२ २२८८३५ किंवा ०२३६३ २७५२५३, ईमेल आयडी sindhudurgrojgar@gmail.com, btri17@yahoo.com या वर संपर्क साधावा. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'