‘महाविस्तार AI ॲप’ वर ३२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी

सिंधुदुर्गनगरी दिनांक १६ (जिमाका) :- हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार AI ॲप’ च्या माध्यातून जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार १०१ शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंदणी केल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहय्याने हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करुन देते. मराठी भाषेत उपब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन करते. ‘महाविस्तार AI ॲप’ मधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरीत उत्तरे देतो. रिअल – टाइम हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल- टाइममध्ये दाखवते. कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळु शकतील ॲपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. ॲपमधील AI तंत्रज्ञानमध्ये शेतकरी पिकाचे फोटो अपलोड करुन पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करुन उपाय मिळवु शकतात. ‘महाविस्तार AI ॲप’ शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यसाठी अनेक फायदे घेऊन आले आहे, त्यामुळे सल्ला त्यांच्या मोबाइलवर मिळतो, ज्यामुळे वेळ वाचतो, चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादने खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामन अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पान्नात वाढ होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आज पर्यत ‘महाविस्तार AI ॲप’ तालुका निहाय नोंदणी पुढीलप्रमाणे :- कुडाळ- ५ हजार ७३८, सावंतवाडी – ७ हजार २३२, वेंगुर्ला २ हजार ५२७, दोडामार्ग- १ हजार ४००, वैभववाडी- २ हजार ६६६, मालवण – ४ हजार २२०, कणकवली- ४ हजार ५९४, देवगड- ३ हजार ७२४ असे एकूण ३२ हजार १०१ शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार AI ॲप’ वर नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘महाविस्तार AI ॲप’डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'