“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना”चे लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी दि.१० मार्चपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणातील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विषेश मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विदयार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना" ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन २०२५-२६ योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील १२ वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विदयार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि.२५ फेब्रुवारी ते दि.१० मार्च २०२६ पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जावून अर्ज भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्ग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग. यांच्याकडे जमा करावयाचे आहे. तरी या योजनेअंतर्गत सन २०२५-२६ साठी विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उदयसिंह गायकवाड सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्ग यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'