दहावी –बारावीच्या विद्यार्थ्याना ग्रेस गुणांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिली जाणारी ग्रेस मार्क्स मिळवण्याची ऑनलाईन सुविधा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा फायदा मिळणार असून विद्यार्थ्यांना प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी पात्र खेळाडूंचे अर्ज क्रीडा संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे. क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षात सवलतीचे गुण मिळावेत, यासाठी ही सुविधा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जाते. क्रीडा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र खेळाडू विद्यार्थ्यांना पोर्टलवर जाऊन आपला अर्ज सादर करता येणार आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :- सवलत गुण मिळवण्यासाठी अर्ज करताना खेळाडू विद्यार्थ्यांनी (1) खेळाडूचे परीक्षा बैठक क्रमांक, (2) फॉर्म क्र. 1 व 2, (3) 12 वी साठी अर्ज करीत असल्यास 10 वी चे गुणपत्रक, (4) क्रीडा प्रमाणपत्र ज्या खेळाच्या आधारे सवलतीचे गुण हवे आहेत, त्या खेळाचे अधिकृत जिल्हास्तरीय, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'