सिंधुदुर्गमध्ये ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ कार्यशाळा संपन्न
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयातर्फे जिल्ह्यामध्ये ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेशन २०२६’ अंतर्गत शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी मायनाक भंडारी सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु ,मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक ,नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधित कामकाज करणारे घटक, संशोधक, बॅका ई.नी उपस्थित राहून मार्गदर्शन केले .
००००००
Comments
Post a Comment