प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक १३ (जिमाका) :- प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची नोंदणी सुरु आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरमहा रक्कम ३ हजार रु.निश्चित पेंशन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोडल अधिकारी, पी.एम किसान योजना तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. ही योजना ऐच्छिक व अंशदायी पेशन योजना असून सर्व अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत. योजनेंच्या मार्गदर्शक सुचनेनुसार १८ ते ४० वर्षे वयोगटातील तसचे भू- अभिलेखांनुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावे २ हेक्टर पर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे. असे शेतकरी योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. ऐच्छिक व अंशदायी पेशन योजना असून मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांनी (अपात्रतेचे निकष लागू सलेले शेतकरी वगळून) त्यांच्या १८ ते ४० वयानुसार रक्कम रु. ५५ ते रु. २०० पर्यंत वयाच्या ६० वर्षापर्यंत मासिक हप्ता भरावयाचा आहे. शेतकऱ्यांच्या मासिक हप्त्याइतकीच रक्कम केंद्र शासन पेशन फंडामध्ये भरणार आहे. शेतकऱ्यांना ६० वर्षे वयानंतर मासिक रक्कम रु. ३००० पेशन मिळणार आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) https://www.pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी मार्गदर्शन सूचनेनुसार आवश्यक असणारी कागदपत्रे (आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इ.) सामाईक सुविधा केंद्रात ( सीएससी) घेऊन जाणे आवश्यक आहे. पी.एम.किसान मानधन योजनेमध्ये शेतकऱ्यांना वृद्धापकाळात निवृत्ती वेतन मिळणार असल्याने जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'