कुणकेश्वर यात्रोत्सवात ‘प्लास्टिक मुक्त’ उपक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक १३ (जिमाका) :- देवगड तालुक्यातील प्रसिध्द कुणकेश्वर यात्रोत्सवात प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव राबविण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातुन ग्रामपंचायत व तालुकास्तवर करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविद्र खेबुडकर यांनी दिली आहे. आपला जिल्हा प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याकरीता प्रचार प्रसिध्दी व्हावी, या हेतुने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन शालेय स्तरावर प्लास्टिक व ई वेस्ट संकलन स्पर्धा, मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र, शाळा व शाळा परिसर स्वच्छता कार्यक्रम, समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम आदीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रोत्सव व कुणकेश्वर यात्रोत्सव प्रसिध्द यात्रोत्सव आहे. या कार्यक्रमांना लाखो भाविक, व्यापारी हजेरी लावत असतात. त्यामुळे या भागात मोठ्याप्रमाणात जैविक व प्लास्टिक कचरा तयार होत असतो. दिनांक 15 ते 17 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित कुणकेश्वर यात्रोत्सवात "प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव" संकल्पना राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या सुचना गटविकास अधिकारी, पंचायत समिती देवगड यांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये यात्रोत्सव काळात "प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव" म्हणुन बॅनर, वर्तनामपत्र, सोशल मिडिया आदीच्या माध्यमातुन व्यापक प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यात्रोत्सवात काळात मंदिर व मंदिर परिसरात कचरा कुंड्याचे नियोजन करण्यात येणार आहे. हॉटेल व फुड स्टॉल यांना जैविक व प्लास्टिक कचरा गोळा करण्याकरीता कचरा कुड्या किंवा निळा व हिरव्या रंगाच्या गारबेज बॅग पुरवठा करण्यात येणार असुन जमा होणारा कचरा त्यांनी एकत्र करुन ठेवावयाचा आहे. यात्रोत्सवाच्या ठिकाणी जैविक कचरा एकत्र करुन योग्य विल्हेवाट लावण्याकरीता ग्रामपंचायती माध्यमातुन ठिकठिकाणी तातपुरत्या स्वरुपाचे कंपोष्ट खड्डे तयार करण्यात येणार आहे. यात्रोत्सवात येणाऱ्या व्यापाऱ्याकडून यात्रा करांप्रमाणे स्वच्छताकर आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असुन प्लास्टिक बंदी अधिनियमा प्रमाणे ज्या व्यापाऱ्याकडे सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास दंडाची तरतुद करुन रितसर दंड आकारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग वासिय, भाविक व व्यापारी यांनी आपला सिंधुदुर्ग प्लास्टिक मुक्त करण्याकरीता पुढाकार घेऊन दिनांक 15 ते 17 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित कुणकेश्वर यात्रोत्सवात "प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव" करण्यास सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविद्र खेबुडकर यांनी केले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'