आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे अभिवादन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २० (जिमाका): मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार भवनात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक आणि समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी आपल्या मनोगतात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्रातून समाजजागृतीची नवी दिशा मिळाली. सत्य, विवेक आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारी पत्रकारिता आजही त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेते. लोकशाही बळकट करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्ण आणि जबाबदार पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव बाळ खडपकर, सदस्य संजय वालावलकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवु महाडेश्वर, संदीप गावडे तसेच दत्तप्रसाद वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी जांभेकर यांच्या कार्याचा आदर्श घेत पत्रकारितेतील नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'