शिधापत्रिका धारकांनी ३० सप्टेंबरपर्यत ई -केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक १९ (जिमाका) :- राष्ट्रीय अन्न सुरक्षायोजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांचे ई- केवायसी प्रमाणिकरण व आयुष्यमान भारत योजनेंतर्गत शिधापत्रिका ऑनलाइन करण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रमाणिकरण प्रक्रिया १०० टक्के पुर्ण करण्यासाठी सर्व तहसिलदार यांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यमंत्री, गृह (शहरे), महसुल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन यांनी आढावा बैठकीमध्ये ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांचा धान्याचा लाभ बंद होणार असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तरी सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करण्याकरीता संबंधित रास्तभाव धान्य दुकानदार यांचेशी संपर्क साधुन ई-पॉस मशिनवर थंब लावुन ई केवायसी प्रक्रीया पूर्ण करण्याची आहे. तसेच ई-केवायसी नाकारण्यात आली असल्यास आपले आधार कार्ड संबंधित तहसिलदार कार्यालयात जाऊन RCMS मधील माहिती सुधारीत करण्याची आहे. "दुकानात जाता नाही आले तर घरी ई-केवायसी करा" राज्यात शिधापत्रिकाधारक यांना ई-केवायसी करण्यासाठी केंद्र सरकारने 'मेरा ई-केवायसी अॅप' सुरु केले आहे या अॅपवरून शिधापत्रिकाधारकांना आता घरबसल्या ई-केवायसी करता येणार आहे. "आयुष्यमान भारत कार्ड योजना" याकरिता सर्व शिधापत्रिकाधारक पात्र असल्याने त्याअनुषंगाने सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करण्याकरीता लाभार्थी यांनी संबंधित तहसिलदार कार्यालय व CSC सेंटर मध्ये संपर्क साधुन शिधापत्रिका ऑनलाईन करावी. सर्व पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के ई-केवायसी प्रक्रीया दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुर्ण करण्याचे व आयुष्यमान भारत कार्ड योजनेंतर्गत सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करण्याकरिता सर्व लाभार्थ्यांना व रास्तभाव धान्य दुकानदारांना आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'