'दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना"चे लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- टपाल विभागातर्फे फिलाटेली हा छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "दिनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना" सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक नंदकुमार कुरळपकर यांनी केले आहे. विद्यार्थ्यांची फिलाटेली (टपाल तिकीट संकलन) आवड वृद्धिंगत व्हावी, यासाठी टपाल विभागाने "दीनदयाळ स्पर्श योजना" शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला आहे. इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये छंद म्हणून फिलाटेलीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ही शिष्यवृत्ती मंडळ कार्यालय मुंबईद्वारे आयोजित फिलाटेली क्विज आणि फिलाटेली प्रकल्पावर आधारित आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम रु 6०००/- असून (दर महा रु 500/-) आहे. विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शाळेत (इयत्ता सहावी ते नववी) प्रवेश घेणे आवश्यक आहे. शाळेत फिलाटेली क्लब असावा आणि विद्यार्थी क्लबचा सदस्य असावा. जर शाळेत फिलाटेली क्लब नसेल तर स्वतःचे फिलाटेली डिपॉझिट खाते असलेल्या विद्यार्थी देखील अर्ज करु शकतात. विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळवले असावे (एससी, एसटी उमेदवारांना 5 टक्के सूट). यासाठीचे अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जातील. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा डाक अधीक्षक टपाल कार्यालय, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी ४१६८१२ या पत्त्यावर पाठवावेत. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या योजनेमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक श्री नंदकुमार कुरळपकर यांनी केले आहे. अधिक तपशीलासाठी आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसशी किंवा डाकघर अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्गनगरी ४१६८१२ दूरध्वनी क्र. ०२३६२-२२८५२० येथे संपर्क साधावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'