कृषी समृध्दी योजनेंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका) :- कृषी समृध्दी योजनेंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 अंतर्गत विविध घटकांसाठी लाभ दिला जात आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी या संकेस्थळावर अर्ज करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. कृषि समृद्धी योजनेंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना सन 2025-26 मध्ये राबविण्यात येत असून यामध्ये क्षेत्र विस्तार, सामूहिक शेततळे, संरक्षित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, मधुमक्षिका पालन व काढणीत्तोर व्यवस्थापन इ. घटक राबविण्यात येत आहेत. यामध्ये सुटी फुले व कंदवर्गीय फुलांची लागवड, कंदवर्गीय व बहुवार्षिक मसाला पिकांची लागवड, विदेशी फळपिकांची लागवड (ड्रॅगनफ्रुट, स्ट्रॉबेरी व अवॅकॅडो) जुन्या व कमी उत्पादन देणाऱ्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन, अळंबी उत्पादन प्रकल्प, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टीक आच्छादन, फळ पिकांकरिता फळांना/ फळांच्या घडांना कव्हर, तण नियंत्रक अच्छादन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, फवारणी पंप, मधुमक्षिका पालन व मध काढणी यंत्र, फार्म गेट पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, फळ पिकवणी कक्ष व फिरते विक्री केंद्र इ. बाबींचा सामावेश असून त्याकरिता 35 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देय आहे. वरील घटकांसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेत सहभागी होण्यासाठी, शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी, कृषि विभागाचे संकेतस्थळ :- http://krishi.maharashtra.gov.in किंवा नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे :- ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी, 7/12 उतारा, 8-अ, आधार कार्डाची छायांकीत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी), विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतु:सीमा नकाशा. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'