जिल्ह्यातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी दि. १२ (जिमाका वृत्त): जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. गावोगावी जाणारे आंतरिक रस्ते, मुख्य मार्गावरील खड्डे तसेच पावसाळ्यामुळे खराब झालेल्या महामार्गांच्या स्थितीची माहिती बैठकीत मांडण्यात आली. तातडीने खड्डे बुजविणे, दुरुस्तीची गुणवत्ता सुनिश्चित करणे आणि ठेकेदारांची जबाबदारी ठरविणे या बाबींवर द्यावा असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बागुल, सावंतवाडी विभागाच्या कार्यकारी अभियंता पुजा इंगवले, राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण तसेच जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'