ओबीसी महामंडळाच्या एकरमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 9 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार असलेल्या लाभार्थीनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची व उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत मुदती कर्ज, बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना, इ. योजनेतंर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.
००००००
Comments
Post a Comment