दिव्यांग तक्रार निवारण समितीची सभा २९ सप्टेंबर रोजी
सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात येते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत सोमवार 29 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन V.C व्दारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी आपल्या नजिकच्या पंचायत समिती कार्यायात उपस्थित राहण्याचे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जयप्रकाश परब यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment