कणकवली येथे 37 पदांकरीता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 9 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सुपर ग्राहक बाजार, कणकवली येथे दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह 37 पदांकरीता आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी पदांसाठी आवश्यक पात्रता तपासून सहभाग नोंदवा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. संगणक ऑपरेटर पदसंख्या-10, पात्रता 12 वी उत्तीर्ण, ITI Copa, पदवी. महिला मदतनीस पदसंख्या- 20, पात्रता 10 वी, 12 वी, पदवी. पुरुष मदतनीस पदसंख्या- 5, पात्रता 10 वी 12 वी, पदवी. सुरक्षा रक्षक (पुरुष) पदसंख्या- 2, पात्रता 10 वी, 12 वी, पदवी. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस सुपर ग्राहक बाजार कार्यालय, तेलीआळी, पंचायत समितीसमोर, कणकवली येथे सकाळी 10 वाजता उपस्थितीत राहावे. ही एक उत्तम रोजगार संधी असून, स्थानिक युवक - युवतींनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'