भूसंपादन मोबदला वाटपासाठी विशेष कॅम्पचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि. १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध भूसंपादन प्रस्तावांमधील ज्या खातेदारांनी अदयापपर्यंत मोबदला रक्कम स्विकारलेली नाही, त्या खातेदारांना मोबदला रक्कम अदा करण्यासाठी "शासन आपल्या दारी" या अभियानांतर्गत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात असल्याची माहिती भूसंपादन उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी दिली आहे. प्रस्ताव क्र. ११/२००६ घोटगे, सोनवडे-मठ-कुडाळ-पणदूर घोटगे-गारगोटी रा. म. १२० घाट रस्ता, मधील खातेदारांना मोबदला वाटप करण्यासाठी दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय घोटगे येथे आणि प्रस्ताव क्र ६/२००९ सोनवडे त. कळसुली- सोनवडे-मठ-कुडाळ-पणदूर घोटगे-गारगोटी रा. म. १२० घाट रस्ता, मधील खातेदारांना मोबदला वाटप करण्यासाठी दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय सोनवडे त. कळसुली येथे तसेच प्रस्ताव क्र ६०१/३/१२ करुळ लघुपाटबंधारे करुळच्या धरण बैठक बुडीत क्षेत्र, सांडवा व पुच्छ कालव्यासाठी, मधील खातेदारांना मोबदला वाटप करण्यासाठी दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय करुळ येथे तर प्रस्ताव क्र. १५/०४ शिरशिंगे, शिवापूर-शिरशिंगे रस्त्याचे बांधकाम मधील खातेदारांना मोबदला वाटप करण्यासाठी दिनांक ०१ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय शिरशिंगे येथे विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. मोबदला न स्विकारलेल्या खातेदारांची यादी तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे, तरी यादीतील खातेदारांनी आवश्यक कागद‌पत्रांसह नमूद दिवशी व वेळी मोबदला स्विकारणेसाठी उपस्थित रहावे. आवश्यक कागदपत्रे (खालील सर्व झेरॉक्सप्रती स्वसाक्षांकित असाव्यात.) १. रेशनकार्ड झेरॉक्स प्रत २. खातेदाराचा १ फोटो ३. निवडणूक ओळखपत्र/पॅनकार्ड/आधारकार्ड ४. राष्ट्रीयकृत बैंक पासबुक झेरॉक्सप्रत / रह झालेला धनादेश ५. बोजा विरहीत अदयावत ७/१२. जर ७/१२ मध्ये इतर हक्कामध्ये बोजा असल्यास संबंधित संस्था/बैंक यांचे रक्कम स्विकारण्याबाबतचा नाहरकत दाखला. ६. खातेदार मयत असल्यास वारस हक्काचा पुरावा. ७. खातेदार १८ वर्षाखालील असल्यास पालन पोषण करणाऱ्याचे नाव असलेले संबंधित सरपंचांचा दाखला ८. विवाहीत महिला असल्यास नावात बदल असलेबाबतचा पुरावा म्हणून विवाहनोंदणी दाखला/लग्नपत्रिका/महाराष्ट्र शासन राजपत्र. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'