महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2025 23 नोव्हेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक १९ (जिमाका) :- शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (TET) – २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी नियोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. ही परीक्षा इ. १ ली ते ५ वी (पेपर १) तसेच (इ. ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/ शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही. परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनाया https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षाध्यर्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी.या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया वि. १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होत असून दि. ०३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील. कार्यवाहीचा टप्पा आणि कालावधी याप्रमाणे- ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी : दि. १५ सप्टेंबर २०२५ ते ३ ऑक्टोबर २०२५ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे : दि. १० नोव्हेंबर २०२५ ते २३ नोव्हेंबर २०२५ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ : रविवार, २३ नोव्हेंबर २०२५, वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १.०० शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II परीक्षा : रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ दुपारी २.३० ते सायं. ५.०० काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकररता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'