" नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर" अर्ज भरण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक २३ (जिमाका) :- जिल्ह्यातील टॉप क्लास विद्यालयांच्या याद्या या कार्यालयास प्राप्त झालेल्या असुन यादीतील सन २०२२-२३,२०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यालयांनी बोर्ड परीक्षेमध्ये सतत १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण असा निकाल प्राप्त केलेला आहे. अशा विद्यालयातील विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी Top Class Education in School For OBC, EBC & DNT Student" Under PM YASHSVI-reg. या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर"सुरु आहे. पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज मुख्याध्यापक यांच्यामार्फत " नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर" भरण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
योजनेचे उद्यिष्ट :- ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा संपूर्ण शैक्षणिक खर्च शासकीय मदतीतुन भागविणे.
पात्रता व कव्हरेज :-
लाभार्थी :- ओबीसी, ईबीसी, डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थी वार्षिक कुटुंबीय उत्पन्नः कमाल २.५० लाख
निवड पद्धत :- मागील वर्गातील गुणांच्या आधारे मेरिट यादी
आरक्षण :- किमान ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव
शाळा निवड :- सलग वर्षांमध्ये १०० टक्के निकाल देणाऱ्या सर्वोत्तम शाळांची निवड
वर्गनिहाय आर्थिक मदत :-
इयत्ता
वार्षिक मदत
समाविष्ट घटक
विषेश बाबी
९ वी
रु.७५,०००/-
शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा फी, पुस्तके, गणवेश शुल्क
८ वी / ९ वी च्या गुणांवर मेरिट यादी
१०वी
११ वी
रु.१,२५,०००/-
वसतिगृह शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, कोचिंग फी शुल्क
१०वी/११वी च्या गुणांवर मेरिट यादी
१२वी
अर्ज प्रक्रिया :-
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे, शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करेल, राज्य सरकारकडून अंतिम मंजूरी, मुलगे व मुलींसाठी स्वतंत्र मेरिट यादी तयार, शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे थेट विद्यार्थ्याच्या खात्यात जमा.
अटी व निरीक्षण :-
आधार लिंक केलेली उपस्थिती प्रणाली आवश्यक, नियमित उपस्थिती व समाधानकारक शैक्षणिक प्रगती आवश्यक, इतर शासकीय योजनेंतर्गत एकाच उद्देशासाठी दुहेरी लाभ घेता येणार नाही. अधिक माहीतीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग यांचे कार्यालय, पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा.
००००००
Comments
Post a Comment