२९ सप्टेंबर रोजी "शौर्य दिन" कार्यक्रमाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व माजी सैनिक यांचा सन्मान करण्यासाठी २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे वतीने सैनिकी मुलांचे वसतिगृह, सावंतवाडी येथील मल्टी पर्पज हॉल येथे शौर्य दिन' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांना दिनांक २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्य दलाने पाकीस्तान हहीत घुसुन सर्जिकल स्ट्राईकव्दारे अतिरेक्यांचा खात्मा केला होता. सैनिक कल्याण विभाग, पुणे यांनी दिलेल्या निर्देशान्वये भारतीय सैन्य दलाची ही अभिमानास्पद कामगिरी जिल्हयातील जनतेपर्यंत पाहोचविण्यासाठी २९ सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरनारी, वीरमाता/वीरपिता, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी, यांनी शौर्य दिन साजरा करण्यासाठी सावंतवाडी येथील मल्टी पर्पज हॉल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.
००००
Comments
Post a Comment