दिव्यांग बालकांची ओळख - तपासणी शिबीराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- दिव्यांग बालकांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शासकीय योजनांची माहिती व लाभ, दिव्यांग प्रमाणपत्र अदा करण्यासाठी वैद्यकीय तपासणी, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड काढणे, नवीन आधार कार्ड काढणे व अद्ययावत करणे तसेच दिव्यांग बालकांसोबत उपस्थित राहणारे शिक्षक व पालक यांच्याकरीता आरोग्य तपासणी याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त दिव्यांग बालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष,तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे या शिबीरामध्ये आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, दिव्यांग विभाग व जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सर्व शासकीय शाळा व अशासकीय संस्था (NGO) यांचेमार्फत दिव्यांग बालकांची ओळख / तपासणी करणेकरीता जिल्ह्यात दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री. भगवती सभागृह, रेल्वे स्टेशन रोड मळगाव (वृक्षवल्ली शेजारी), ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या ठिकाणी दिव्यांग बालकांसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच त्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव, संपूर्णा गुंडेवाडी, तसेच तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी, कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ व दोडामार्ग या कार्यालयांशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग या कार्यालयाचा ई-मेल आयडी - dlsa-sindhu@bhc.gov.in, संपर्क क्र.०२३६२-२२८४१४/८५९१९०३६०७, हेल्पलाईन क्रमांक-१५१०० संपर्क साधावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'