महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर रोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 12 दुपारी व दुपारी 3 ते सायंकाळी 5 यावेळेत दोन सत्रात विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली आणि कणकवली कॉलेज कणकवली या दोन उपकेंद्रावर आयोजित करण्यात आलेली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी एकूण 499 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली येथे KD001001 ते KD001312, आणि कणकवली कॉलेज कणकवली येथे KD002001 ते KD002187 या 2 उपकेंद्रावर बैठकीचे व्यवस्था केली आहे.
या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना,
आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षाकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी (Frisking)करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.
०००००
Comments
Post a Comment