शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांचे 8 सप्टेंबरपर्यंत वाटप

सिंधुदुर्गनगरी दिनांक 3 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात प्राप्त झाली असून त्यांचे वितरण 8 सप्टेंबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली आहे. प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी उमेदवारांनी स्वत:उपस्थित राहणे आवश्यक आहे. यावेळी उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र, गुणपत्रिका, डी.टी.एड, बी.एड उत्तीर्ण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), दिव्यांगत्व प्रमाणपत्र, माजी सैनिकाचा पुरावा (लागू असल्यास) तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. अन्यथा उमेदवारांना प्रामणपत्र देण्यात येणार नाही. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रमाणपत्र श्री. थोरात मोबा. 9421130606 यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागाच्या वतीने प्रसिध्दीप्रत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'